दादा म्हटलंकी भीती पण येथे दादा यांच्या बाबतीत थोडे वेगळे ,भीती असते ती आदरयुक्त बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील गुरु अनेकांचे मार्गदर्शक म्हणून चंपावतीपत्रचे संपादक नामदेवराव क्षीरसागर उर्फ दादा यांचा उल्लेख होतो एक विचाराशी ठाम असणारे संपादक म्हणून अनेक सामाजिक राजकीय नेते ,कार्यकर्ते त्यांचा उल्लेख करतात त्या पत्रकारितेचे जिल्ह्यातील भीष्माचार्य नामदेवराव क्षीरसागर उर्फ दादा यांचा आज(06/06) वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ….
माना कि अखबार कि लाईफ काम होती है मगर उसका असर सालो ताक  चालता है . गेल्या ५४ वर्षांपासून अविरत आणि अखंड पणे दैनिक चंपावतीपत्र चे प्रकाशन होत आहे त्याला तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत माणसाचे वय जस दिवसात वर्षात मोजलं जात तस दैनिकाचे मोजतांच येणार नाही वर्तमानपत्र  काढणं सोपं चालवणं अवघड आहे पण केवळ स्वभाव सर्वाशी सामंजस्य आपलेसे पण यामुळे ते दादांना शक्य झाले अगदी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील ते कर्मचाऱ्या प्रमाणे चे तर तो आपल्या कुटूंबातील सद्यस्य आहे याप्रमाणे वागतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना देखील हे दैनिक आपले हि भावना निर्माण होते एक कुटूंब वात्सल्य व्यक्तिमत्व म्हणून दादांचा उल्लेख होतो .त्यांना खोटे जमत नाही  आणि सार्वजिक पण सर्वांच्या हिटाची एखादी बाब असेल तर त्याला पुरेपूर सहकार्य करण्याची त्यांची मानसिकता अनेकांना आवडते त्यांनी कधी आपल्या पत्रकारितेचा वापर स्वार्थासाठी केला नाही जनहिताचा प्राधन्य आज पर्यंत दिले गेले संपादक असताना आपल्या दैनिकातून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्याचे काम बातम्यांच्या माध्यमातून तर चालूच असते पण जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड रेल्वे मार्गाच्या मागणीत त्याचा वाटा आहे यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा यासह देवस्थान वाचनालय शैक्षणिक या कामात देखील ते पुढेच असतात त्याच्या हातून अनेक कामे होणे आहेत त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईशवर चरणी प्रार्थना दादांना पुनश्च वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपला शुभचिंतक