दर्पण दिना निमित्त पाटोदयात पत्रकाराचा आर्दश उपक्रम
पाटोदा । वार्ताहर
पाटोदा तालुक्यात मराठी पञकार परिषदेच्या बरोबरच पाटोदा तालुका पत्रकार संघ,पाटोदा ता. युवा पत्रकार संघ, पाटोदा ता. ग्रामीण पत्रकार संघ, पाटोदा ता.साप्ताहिक संपादक संंघ या सर्व वेगवेगळ्या संघटना होत्या दि.६ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पणदिनाचे औचितेसाधुन मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त.एस. एम. देशमुख सर, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे यांच्या सुचने वरून मराठी पञकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट कोल्हे.मार्गदर्शक सोमीनाथ कोल्हे यानी सर्वाना एकञित करुन मराठी पञकार परिषद ही सातत्याने सर्वाच्या अडीअडणीला धावुन जाते.व मदत करते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकञीत येवुन एकमताने सर्व पञकारानी मराठी पत्रकार परिषदे मध्ये सदस्य नोंदणी केली.
  मराठी पञकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट कोल्हे.व तालुकाध्यक्ष सोमीनाथ कोल्हे यानी पाटोदा तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक दि.६ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पणदिना निमित्त पाटोदा येथे शासकीय विश्रामगृह येथे मराठी पत्रकार परिषदेचीबैठक घेतली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पञकार इद्रीसभाई चाऊस हे होते.या वेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या पाटोदा तालुका अध्यक्षपदी. सोमिनाथ कोल्हे यांची निवड करण्यात यावी अशा सर्वानुमते एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी पोपट राऊत.इद्रीसभाई चाऊस.सोमीनाथ कोल्हे..दयानद सोनवणे.पोपट कोल्हे.बाळासाहेब लांडगे.किरण शिंदे .बाजीराव जाधव .अमिर शेख.सचिन पवार.हमिद पठाण.चंद्रकात पवार.जितेद् भोसले यानी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.तसेच पुरस्कार मिळालेले पञकार महेश बेदरे.अनिल गायकवाड व बाजीराव जाधव व अजय जोशी यांच्या वाढदिवसानिमित परिषदेच्या वतीने सत्कार केला या वेळी पाटोदा.तालुका पत्रकार संघ,पाटोदा ता. युवा पत्रकार संघ, पाटोदा ग्रामीण पत्रकार संघ, पाटोदा ता.साप्ताहिक संपादक संंघ या सर्व पञकार संघटनांनी एकत्र येऊन काम करण्याचे ठरविले व मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य नोंदणी करून घेतली. व सर्व गट तट विसरून मराठी पत्रकार परिषदे मध्ये सामील होऊन एक प्रकारे आदर्श निर्माण केला आहे. या वेळी तालुक्यातील सर्व दैनिकाचे.साप्ताहिकाचे पत्रकार व  पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चाटे सर प्रस्ताविक अमिर शेख.       यांनी केले तर आभार मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चंपावतीपञचे पत्रकार पोपटरावजी कोल्हे यांनी मानले.