काल औरंगाबाद मध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस बंधावला मारहाण झाली याचा सर्वत्र निषेध झाला आणि व्हायलाच पाहिजे संकटाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून तुमची आमची सुरक्षा रस्त्यावर चोवीस तास थाबून करत आहेत याची जाणीव सर्वांना असायला हवी पण अशा पोलिस देव माणसावर हल्ला झाला का तर किरकोळ कारण, मला हटकले याच कारणावरून त्या टपोरिने आपापल्या टपोरी मित्रांना बोलावून पोलिसांवर हात उचलला हे निदनीय पण अशा टपोरींना नीट करण्याचे औषध पोलिसांकडे आहे ते वेळ आली की देतात पण दुःख या गोष्टीचे वाटते जे आपल्या सर्वांच्या भल्यासाठी जीवाची पर्वा न करता सेवेत आहेत त्याच्या पुढे नतमस्तक होऊन हात जोडण्या ऐवजी त्याच्यावर हात पडले.या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झालेआणि सर्व स्तरावरून पोलिसांची पाठराखण होऊ लागली ती व्हायलाच पाहिजे हे झाले औरंगाबाद चे याच्या उलट बीड मध्ये होतय पण लोक म्हणतात बरा रेटला बाहेर काय बापाची पेंड होती का अजून जरा दोन काठया मारायच्या होत्या या सामन्याच्या प्रतिक्रिया . पण दोन दिवसापूर्वीच सारडा नगरी समोर एकास पोलिसांनी दांदुक्याची समज दिली तर पोलिस किती गुन्हेगार आहेत तो पास धारक होता समाजसेवक होता अमुक तमुक होता असं चित्र समोर आणलं गेलं का तर त्याच्या मागे जाहिराती पार्शवभूमी असावी असो मारल ते चूक पण पाठराखण सुद्धा चूकच .समजा त्याच्यकडे पास होता तर काय त्याला अधिकार थोडेच दिले होते पास केवळ सवलत आहे अधिकार नाहीत आणि पास धारक गर्दीत कशाला गेला होता तो काही कोरोना वरील औषध शोधायला नव्हता गेला, खरे पहिले तर तो एखाद्या संस्थेचा कर्मचारी असू शकतो कारण असो लोक पासचा वापर करून समाजसेवेच्या नावावर फिरत असल्याच्या तक्रारी आहेत जमावबंदी गर्दीत कोणती समाजसेवा करायला जातात पासचा तर बाजारच झाल्याचे बोलले जाते आम्ही पत्रकार आहोत पण या बंदच्या काळात पस मुळेअसे अनेक पत्रकार बांधव दिसले कि त्यांची यापूर्वी कधीच भेट झाली नाही ती पास मुळे घडली आणि या पास मुळेच रस्त्यावर अधिक वाहने दिसत आहेत खरा पत्रकार बिगर कामाचे रस्त्यावर येतच नाही बातमी घ्यायची तर गर्दीपासून दूर राहून बातमी मिळवतात आणि पोलिसांना सहकार्य करतात अशा काळात पोलिसाचे मनोबल वाढेल असेच काम आपण नागरिक म्हणून केले पाहिजे पोलिस विनाकारण मारहाण करत नाहीत कोणाला घरातून बाहेर आणून मारहाण केल्याचे दिसले आहे काय नाही ना मग नियम तोडल्यावर काहीतरी तुटणार केवळ पोलिसांना टार्गेट करने चूक आहे नेहमी आदेश देण्याची सवय असल्याने मी म्हणेल तेच म्हणत पोलिसांना चूक ठरवणे कितपत योग्य आहे जे औरंगाबाद मध्ये घडले तेच बीड मध्ये फक्त पद्धत वेगळी अन् चुकीची त्याचा आपण निषेध च केला पाहिजे