बीड । प्रतिनिधी शहरातील वीर हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या एका नवजात अर्भक प्रकरणात बीड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तपास करत असताना त्यांना त्यावेळी असलेल्या महिलेचा ठावठिकाणा लागत नसल्याने पेच निर्माण झाला आहे,
 काल संध्याकाळी शहरातील वीर हॉस्पिटलमधील शौचालयात एक पुरुष जातीचे अर्भक आढळून आले होते. या प्रकरणी बीड शहर पोलिसांनी एका विवाहित महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. त्याच महिलेने काल अर्भक सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येते. दुपारपर्यंत तिची चौकशी सुरू असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पीआय रवी सानप यांनी दिली.