बीड / प्रतिनिधी
पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांच्या आदेशावरून आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवर असलेल्या अट्टल गुन्हेगाराचा शोध सुरु असून काल आणि परवा या दोन दिवसात स्थानिक गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकाने पाच कुख्यात दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.
काल ताब्यात घेतलेल्यांमध्ये शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम रा. बांगरनाला बीड, शेख बब्बर शेख युसुफ रा.खासबाग यांना काल पुणे आणि बनसारोळा केज येथून ताब्यात घेतले. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या शिक्षकाच्या खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिसरा आरोपी पिन्या बाळु भोसले रा.तेलगाव ता.माजलगाव जि.बीड याला ११ तारखेला सोनपेठ येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ३९५ चा गुन्हा दाखल आहे. चौथा आरोपी संपत आबासाहेब गवते रा.राजापुर ता.गेवराई याला पुण्यावरून पोलीसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात ३९५ चा गुन्हा दाखल आहे. पाचवा आरोपी दिपक गौतम पवार, रा.टाकळीअंबड ता.पैठण याला काल पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर जालना, औरंगाबाद,बीड येथे दरोडे, जबरी चोरी, खून, लुटमार यासारखे आकरा गुन्हे दाखल आहेत.
…………………………………