वाहनधारकाच्या खिशाला झळ
बीड / प्रतिनिधी
कोरोनामुळे सर्वसामन्यासोबतच वाहनधारक देखील आर्थिक कोंडीत असताना केंद्र पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढवीत असल्याने या दरवाढीचा भडका फाटा वाहनधारकाच्या खिशाला झळ बसत आहे बीडमध्ये पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ९५.८५ पैशांवर जावून पोहचले आहे तर डिझेलचे भाव ८५.२९ पैशांवर जावून पोहचले आहेत.
केंद्र सरकार्‍या अवाढव्य कर प्रणालीमुळे पेट्रोल आणि डिझेलची रोजच दरवाढ होत असल्याने महागाई प्रचंड वाढत आहे. आधीच आर्थिक कोंडीत असलेल्या सर्वसामान्य माणसाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने अधिक कोंडी करून टाकली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेल २५ ते ३० पैशाने वाढले. मराठवाड्यात पेट्रोलचे दर पेट्रोल दर ९६ रुपयांच्याही वर गेले आहेत. डिझेल ८६ रुपयांपर्यंत जात असून बीड जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९५.८५ तर डिझेलचे दर ८५.२९ पैसे एवढे आहेत. अवघ्या काही दिवसात पेट्रोल शंभर रुपयांपर्यंत जाण्याची श्यक्यता नाकारता येत नाही या दरवाढीचा फटका मात्र वाहनधारकांना सहन करावा लागत आहे .
…………………………………….