बीड / प्रतिनिधी
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर बंजारा समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार परळीतील गुप्त ठिकाणी बंजारा समाजातील प्रमुख लोकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मोजकेच समाजबांधव उपस्थित आहेत. या बैठकीनंतर बंजारा समाज संजय राठोड यांच्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आज सकाळीच बंजारा समाजाचे नेते मनीष जाधव प्रा पी टी चव्हाण यांनी पूजाला न्याय मिळवून द्यायची मागणी केली होती. परळी तालुक्यातील पूजा चव्हाण हिचा पुण्यामध्ये उच्चभ्रू वसाहतीत संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तिला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, असे आवाहन शेतकरी नेते आणि विमुक्त घुमंतू जनजाती महासभा प्रदेशाध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले होते. समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, अशी अपेक्षा मनीष जाधव यांनी व्यक्त केली होती.याच प्रकरणात अरुण राठोड याचे देखील नाव पुढे येत असून तो देखील परळी तालुक्यातीलच रहिवासी असल्याचे समजते कारण ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यात अरुण राठोड महत्वाचा दुवा आहे त्याच पोलीस शोध घेत आहेत यातच मयत पूजाचा भाऊ याने सोशल मीडियावर पोष्ट टाकली असून माझी बहीण वाघीण होती ति आत्महत्या करू शकत नाही पाण्यात एका मंत्र्यांचे नाव पुढे आल्याने प्रकरण आणखी गुंता गुंतीचे झाल्याने असल्याने परळीत बंजारा समाजच्या काही ठराविक नेत्यांनी गोपनीय बैठकीचे आयोजन केले होते अशी चर्चा आहे
…………………..
नेमकं प्रकरणं काय?
पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात राहत होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.