अर्थसंकल्प अधिवेशनास आज सुरवात झाली पहिल्याच दिवशी अनेक घडामोडी घडल्या पण न विसरण्यासारखी घटना म्हणजे आ सुधीर मुनगंटीवार यांची वैद्यांनीक विकास मंडळाची( मराठवाडा विदर्भ विकास अनुशेष,)मागणी…. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उत्तर, अगोदर बारा आमदारांची यादी जाहीर करा लगेच विकास मंडळाची घोषणा करू…… यानंतर लागलीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचे तेवढ्याच पोटतिडकीने दिलेले उत्तर आणि केलेला निषेध ,
मी काही भाजपचा समर्थक म्हणून नाही पण मराठवड्याचा सुपुत्र एक पत्रकार म्हणून व्यक्त होत आहे. आज अजित दादाचे चुकलेच ,तुमचे झाले राजकारण पण तुमच्या राजकारणामुळे मराठवाडा विदर्भाच्या विकासासाठी असलेल्या वैदनिक विकास मंडळाला मान्यता मुदतवाढ देण्या ऐवजी अगोदर बारा आमदाराच्या निवडी जाहीर करा नंतर मंडळ जाहीर करू हे मराठवाडा विदर्भातील जनतेला न पटण्यासारखे आहे ,
विदर्भाचे माहीत नाही पण मराठवाडा नेहमीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाच्या पाठीशी उभा राहिला आहे, आणि सर्वाधिक आमदार दिले मग ते काँग्रेस मध्ये असोत पुलोद मध्ये असोत की राष्ट्रवादीत .पश्चिम महाराष्ट्र पाठोपाठ मराठवाडयातील जनतेने प्रेम दिले त्याच मराठवाड्याच्या विकासासाठी असलेल्या वैदनिक विकास मंडळाच्या मुदत वाढीस राज्यपाल नियुक्ती आमदारांचा मुद्देशी जोडला ,हा विषय काही मराठवाडा विदर्भातील जनतेच्या हातात किंवा भाजपच्या हातात नाही, राज्यपाल भाजप समर्थक आहेत असा आरोप असेल तर आजच्या भाषणात अनेकवेळा राज्यपाल म्हणाले हे आपले सरकार आपले सरकार, पण तरीही राज्यपालवर रोष असेल तर राज्यपालांना परत पाठवण्याची तरतूद आहे आणि ते सरकारच्या हातात आहे, पण त्या निवडीमुळे मराठवाडा विदर्भाच्या बाबतीत दादाची अशी भूमिका काही पटली नाही, असो आज भाजप आमदार मुनगंटीवार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थनच करावे लागेल का तर त्यांनी आमच्या विभागाची मागणी लावून धरली जेव्हा दादांनी अगोदर बारा आमदाराच्या नियुक्त्या जाहीर करा नंतर लागलीच वैदनिक विकास मंडळाला मुदतवाढ देऊ असे म्हणताच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला पण एकंदरीत दादाचे आजचे वक्तव्य न पटण्यासारखे आहे,

एखाद्यास हे पटणार नाही त्या बद्दल क्षमस्व पण विषय मराठवाड्याचा आहे म्हणून

सुभाष चौरे
कार्यकारी संपादक दै चंपावतीपत्र बीड,
जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद बीड