बीड  / प्रतिनिधी
कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. जसे रूग्ण वाढू लागले त्याचप्रमाणे मृत्यूही वाढु लागले. बीड जिल्ह्यात दररोज ४०० पर्यंत नवीन कोरोना रूग्ण आढळून येवू लागले. गेल्या २४ तासात जिल्ह्यात नऊ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या कोरोना रूग्णामुळे आरोग्य प्रशासनावर याचा मोठा ताण पडु लागला. बीड जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉकडाऊन केले असले तरी रूग्ण संख्या मात्र कमी झाली नाही. गेल्या २४ तासात नऊ जणांचा मृत्यू झाला त्यात माजलगाव मयत २, परळी १ ,, बीड २,, अंबाजोगाई २,केज २ असे आहेत कोरोना बाबतचे नियम कडक पाळण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाचे असले तरी अनेक नागरिक नियम पाळीत नसल्याचे दिसून आले आहे. गर्दी टाळावी, मास्क वापरावे अशा सक्तीच्या सूचना जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या आहेत. मात्र बहुतांश नागरिक आजही मास्कचा वापर न करता प्रवास करत आहेत.