बीड / प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ९७ हजार नागरिकांना कोरोना लस देण्यात आली तर १३५३६ नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला असून आणखी लस आवश्यक असल्याने पेशासनाने मागणी केली असून लस सुरक्षित असल्याने लस घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे .
. बीड जिल्ह्यात गेल्या चाळीस दिवसांपासून कोरोनाचे लसीकरण सुरू असून आतापर्यंत ९७ हजार ६८५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. लसीकरणाचा हा वेग अत्यंत कमी आहे. काही जण लसीला घाबरत आहेत. परंतु लस सुरक्षित असून आजपर्यंत ज्या ९७ हार ६८५ जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आणि ज्या १३ हजार ५३६ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला त्यांना विशेष असे कुठलेही साईड इफेक्ट दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
आणखी लस आवश्यक
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ११ हजार २२१ लस देण्यात आल्या असून ४२ हजारंच्या आसपास आजही आरोग्य विभागाकडे लस उपलब्ध आहेत. त्यापुढे जात एक लाख लसीची त्यांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे. जिल्ह्याच्या ११६ ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र उभारण्यात आले असून १३ ठिखाणी खासगी लसीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहेत.प्रशासनाने आणखी लसीची पूर्वाध करण्यात यावा अशी मागणी केली आहे आणि ती लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे .