बीड  / प्रतिनिधी
शासकीय कर्मचार्‍यांना यापुर्वीच लस देण्यात आली होती मात्र एसटी कर्मचार्‍यांना लस दिली गेली नव्हती. सदरील कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे एसटी कर्मचारी नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात आज बस बंद असल्या तरी त्यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे .
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. प्रथम टप्प्यात सर्व शासकीय कर्मचार्‍यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर साठ वर्षांपुढील वृद्धांना लस दिली गेली. तिसर्‍या टप्प्यात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांना लस देण्यात येणार असून संबंधित कर्मचार्‍यांना लससाठी नोंदणी करावी लागणार आहे.