बीड / प्रतिनिधी
कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाने लोकडाऊनकेल्यामुळे लहान मोठे व्यावसायिक व्यापारी जॅकी १ नंबरमध्ये व्यवसाय करतात त्यांची मोठी अडचण निर्माण झाली असून व्यापारी व्यवसाय सुरु व्हावा म्हणून रस्त्यावर उतरत असताना दुसरीकडे दोन नंबरवल्याची मात्र चांदी असल्याचे दिसत आहे या बंद काळात अवैध्य वाळू वाहतूक दारी विक्री पट्ट्याचे क्लब यांची मात्र चांदी असल्याचे पोलिसांनी केलेल्या आजपर्यंतच्या काही कारवायांमधून दिसत आहे.
 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्यने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत त्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणारे व्यापारी ते लहान असोत कि मोठे त्याचे अतोनात नुकसान होत आहे शिवाय हातावर पॉट असणाऱ्यांची तर दोन वेळच्या खाण्याची पंचाईत झाली आहे पण दोन नंबर वाल्याचा हि एक चालून आलेली संधीच आहे पट्ट्याचे क्लब चालवणाऱ्यानी आपली दुकाने खुले आम सुरु केली असून शहरात बंद आहे तर शहराबाहेर शेतात जुगाराचा डाव रंगवला जात आहे गेल्या आठवड्यापासून पोलिसांनी जिल्हयात अनेक ठिकाणी पट्ट्याच्या क्लबवर छापे मारून कारवाई केली म्हणजे जिल्ह्यत मोठ्याप्रमाणात पट्ट्याचे क्लब आहेत हे नाकारता येत नाही त्याच बरोबर अवैध्य रित्या दारूची विक्री होत आहे दिन दिवसापूर्वीच नागपूर येथील बनावट दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्धवस्त करत जवळपास ८७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला अवैध्य वाळू वाहतूक तर जोरातच आहे याच्या देखील अनेक घटना घडल्या काहींवर कारवाई झाली तर काही चिडून दिल्या ढेकणमोह जवळ तहसील दर यांच्या वाहनावर वाळूचे ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला पण त्याची तक्रार कुठेच करण्यात आली नाही एकंदरीत प्रामाणिक असलेले आणि नंबर १ मध्ये व्यवसाय करणाऱ्यांना याकाळात मंदी तर २ नंबर वाळ्याची मात्र चांदी आहे तेव्हा पोलीस अधीक्षकांनी मोहीम हाती घेऊन आणि रेकॉर्डवर असलेल्या जुगाऱ्याचा किंवा क्लब चालकाचा शोध घेऊन कारवाई कारवी