बीड / सुभाष चौरे
भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्टेची केली होती पण त्यांना सत्ता खेचता आली नाही मात्र बंगालचा टायगर आपण म्हणतो येथे वाघीण पण आहे त्या ममता दिदी नि पंतप्रधान मोदी यांच्या सर्व टीमला धूळ चारत बंगालचा गड कायम ठेवला या निवडणुकीत एकाच झालं ते म्हणजे ममतांनी आपली ताकद पंतप्रधान मोदी याना दाखवली पण जिकंले दिघेंही ते असे पश्चिम बंगालमध्ये ममता दीदीं ने सीपीएम आणि मोदी यांच्या भाजपने काँग्रेस चा सफाया केला.
पश्चिम बंगालच्या निकालानंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी यावर वेगवेगळे विश्लेषण केले शेवटी ममता दिदी भारीच पडल्या यात दुमत नाही आणि ज्या भाजपने जि निवडणूक प्रतिष्टेची केली होती म्हणजे निवडणूक लागण्याच्या काही महिने त्यांनी फिल्डींग लावली त्यात सत्ता खेचण्यात यश आले नाही बाब खरी आहे पण अवघ्या ३ या संख्यावरून ८३ पर्यंत मजल मारणे म्हणजे हे मोठे यशाचं म्हणावे लागेल बोटावर मोजण्या इतकी भाजप सदस्य संख्या असणारा पक्ष तेथील विरोधीपक्ष बनला पण सुरवातीला पश्चिम बंगाल मधील माकप सीपीएम या डाव्या ची सत्ता उलथून टाकण्याचे काम ममता दीदीने पूर्वीच केले होते त्यासोबत काँग्रेसला देखील पुढे सरकू दिले नाही मग या राज्यात नवख्या असणाऱ्या भाजपाची काय मजल कि ते ममता यांची सत्ता हिस्कावू शकतात थानिक मुद्दे स्थानिक राजकारण म्हणून दीदींना येथे सहानुभूती आहेच शिवाय त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांच्या पक्षाला जनतेने पुन्हा संधी दिली दुर्दैव हेच कि स्वतः ममता दीदींना आपल्याच शिष्याकडून १६२२ मतांनी पराभव स्वीकारावा लागला गट दिन वेळा नंदीग्राम या मतदार संघातून ममता दिदी निवडून आल्या होत्या पण यावेळी त्यांचेच शिष्य अधिकारी यांनी त्यांचा विजय रोखला निवडणुकीत भाजपचे अधिकारी यांनी खुले आव्हान दीदींना दिले होते ते म्हणजे माझा प्रभाव झाला तर राजकारणातून सन्यास घेईल इतका आत्मविश्वास अधिकारी याना होता तो सिद्ध झाला पण सत्ता भाजपाची आली नाही ममता पराभूत झाल्या असल्यातरी त्याच आगामी मुख्यमंत्री असतील यात शंका नाही पण भाजपने पहिल्यांदा मिळवलेले यश या पराभवात झाकणारे नाही पण मोदी आणि दिदी या दोघांचा देखील पश्चिम बंगालच्या निवडणुकीत विजय झाला तो कसा तर दीदीने माकप भाकप या डाव्यांना तर मोदींनी काँग्रेसला पूर्ण रोखल्याने या दोघांचाही येथे विजय आहे