एसपी डीवायएसपी रस्त्यावर उतरले ;पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये
……………………..
मोक्कार फिरणाऱ्या वाहनचालकांची अँटीजेन
७१० तपासण्यात ४३ पॉझिटिव्ह ;बीड मध्ये ३२
बीड / प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाने आज पासून शहरात विनाकारण मोटारसायकल व चारचाकी वाहनावर फिरणाऱ्यांना चांगलाच धक्का दिला आहे खुद्द पोलिसाधिक्षक राजा रामास्वामी उपाधीक्षक वाळके यांनी रस्त्यावर उतरून वाहनधारकांची चौकशी केली बीड शहरात आठ ठिकाणी तर अंबाजोगाई शहरात चार ठिकाणी तपासणी पॉईंट ठेवले होते त्याच ठिकाणी वैधकीय पथक अँटीजेन चाचण्यांसाठी तैनात करण्यात आले होते जिल्ह्यात ७१० वाहनधारकांची या मोहिमेत तपासणी करण्यात आली यात ४२ वाहनधारक पॉझिटिव्ह आढळले बीड मध्ये ५४८ वाहन धारक हि कारवाई करण्यात आली यातील ३२ जण पॉझिटिव्ह आले हे पूर्वीच करायला हवे होते पण उशिरा का होईना मोहीम व्हॅल्यू केल्याने बाधित रुग्णाचा एकदा आटोक्यात येईल .
जिल्ह्यात सध्या १५ मी पर्यंत कडक निर्बंध लागू आहेत पण या काळात देखील अनेक वाहन धारक काम नसताना रस्त्यावर फिरताना दिसत आहेत पूर्वी जिल्हाधिकारी यांनीच पोलीस प्रशासनाला कडक कारवाई करू नका म्हणून सूचित करण्यात आले होते पण जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नाही संख्या वाढतच आहे आणि शहरात बिन कामाचे फिरणाऱ्याची संख्या कमी होत नसल्याने आणि १ मे पासून १५ मे पर्यंत कडक निर्बंध मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्या नंतर आज ३ मे पासून बीड जिल्ह्यात कडक अमलबजावणी करण्यात आली आज सोमवारी पोलीस अधीक्षक आर राजा यांनी सर्व पोलीस प्रशासनाला आदेश दिले कि वाहन धारकाची कसून चौकशी करा कोणत्या कामासाठी बाहेर पडला काम महत्वाचे आहे का जर असेल तर सोडा अन्यथा कारवाई करा शिवाय त्या वाहनधारकांची त्याच ठिकाणी अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्याने आज सकाळपासून त्याची कडक अमलबजावणी करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच अधीक्षक ए राजा उपाधीक्षक वाळके यांनी वाहनधारकांची तपासणी आणि चौकशी सुरु केली तर बीड शहरात ८ ठिकामी तपासणी पथक फिक्स करण्यात आले त्यात शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका,
माळीवेस, चऱ्हाट फाटा ,बायपास ,डॉ आंबेडकर चौक ,नगर नाका ,जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दिवसभरात ५४८ वाहन धारकाची तपासणी करण्यात आली यात ३२ वाहन धारक पॉझिटिव्ह आले तर असच उपक्रम अंबाजोगाईत देखील राबण्यात आला या ठिकाणी ११ वाहन धारक पॉझिटिव्ह आले आजच्या पोलीस कारवाईचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे
……………………………..
हे पूर्वीच करायला हवं होत
जिल्ह्यात बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे बीड शहरात आणि परिसरात देखील संख्या अधिक आहे तेव्हा पूर्वी पासूनच पोलिसांनी अशा बिनकामाच्या रिकामटेकड्या वाहन धारकांना पकडून चाचणी करण्याचा उपक्रम राबवायला हवा होता आज बीड शहरात तपासणीमध्ये ३२ वाहन धारक पॉझिटिव्ह निघाले तपासणी केलीच नसती तर हे ३२ जण किती जागेवर फिरून आले असते आणि त्याच्या पासून किती जाणलं संसर्ग झाला असता असो उशिरा का होईना पण तपासण्या चालू केल्या