बीड । प्रतिनिधी
पाटोदा शहरातून जात असलेल्या, पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे, काम सध्या पाटोदा शहरात चालू आहे,. या कामा अंतर्गत शहरातील मध्यभागी असलेल्या, राजमोहम्मद चौकातील कब्रिस्तानची संरक्षण भिंत तोडण्यात आली होती,.या संरक्षण भिंतीच्या चिटकून असलेल्या कबरी बुजवून न घेता, तिरुपती कंट्रक्शनने त्या उघड्या सोडून दिल्यामुळे, त्या कबरी तील मृतदेहांचे अवशेष बाहेर आलेले आहे,. तसेच त्या अवशेषांचे कुत्रे लचके तोडत असल्याचे दिसून येत आहे,यामुळे कब्रिस्तानातील मानवी देहाची  तिरुपती कंट्रक्शनकडून, विटंबना होत आहे,
.याबाबतीत शासनाने तिरुपती कंपनी च्या मालिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात करावे,  अशी लेखी तक्रार डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड, हमीदखान युसुफखान पठाण, शेख जावेद शेख रज्जाक, शेख जिलानी शेख बशीर, शेख महेशर, शेख ताहेर यांनी  नायब तहसीलदार सुधाकर टाक यांना निवेदन दिले ,निवेदनावर शेख आसिफ, शेख नदीम, शेख ईरान,शेख सलिम पाशा मियां,सय्यद आतिक शाह, सय्यद अझहर शाह, जहीरूद्दीन पटेल, शेख खय्युम, खलिल शेख आदिच्या स्वाक्ष-या आहेत. तसेच पालकमंत्री धनंजय मुंढे यांच्या वरदहस्तामुळे तिरूपती कन्स्ट्रक्शनचा मुजोरपणा वाढला असल्याचा आरोप डॉ ढवळे यांनी केला आहे