हल्लेखोरांवर कठोर करावाई करण्यासाठी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

..बीड । प्रतिनिधी  जाफराबाद येथील दै. पुढारी चे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. बीड येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हल्ल्याचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी यांना हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.याबाबत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. वाळू माफीया त्यांच्या विरोधात बोलणारोधात किती टोकाची भूमिका घेऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. अलीकडच्या काळात अवैध धंदे करणारे लोक ठिककिठाणी पत्रकारांवर हल्ले करत आहेत. अशा घटना खूप दुर्दैवी आहेत. जाफराबाद येथील दै. पुढारी चे पत्रकार ज्ञानेश्‍वर पाबळे यांनी वाळू माफीयांच्या काळ्या धंद्याविरोधात बातम्या प्रसिध्द केल्या होत्या. याचा राग मनात धरून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्याची व्हिडीओ क्‍लीप समाज माध्यमात व्हायरल झाली आहे. ती पाहिल्या नंतर हल्ला किती जीवघेणा होता हे कळते. या हल्ल्यांचा बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषद तीव्र शब्दात निषेध करत आहे. हल्लेखोर कोणीही असोत, त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी. सबंधितांवर कारवाई झाली नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे,  कार्याध्यक्ष दत्ता आंबेकर विशाल साळुंके, साहस आदोडे चंद्रकांत साळुंके व पदाधिकारी यांनी दिला आहे.