शेतकऱ्याच्या जाणून घेतल्या व्यथा ; पंचनामे करण्यास उशीर लावू नका तलाठयांना स्पॉटवरूनच सूचना
subhash choure

बीड / प्रतिनिधी
जिल्हाधिकारी म्हटलं कि मोठा थाट पण याला फाटा देत जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी कोणताही बडेजाव न करता आज पडत्या पावसात रस्ते चिखलाने माखलेले अशा स्थिती मोटारसायकलवर बसून शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे असा शेतकर्यां अधीर दिला त्याच वेळी त्यांनी त्यांच्या सोबत असलेले तहसीलदार उपविभागीय अधिकारी तलाठी याना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा उशीर लावू नका असे अदेश  दिले असा जिल्हाधिकारी जिल्ह्याने आणि शेतकऱ्यांनी पहिल्यादाच पहिल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
मागील दोन दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे शनिवारी गेवराई तालुक्यात आले होते . दरम्यान सायंकाळच्या सुमारास तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली . यावेळी देखील जिल्हाधिकारी थांबले नाही , पडत्या पावसात त्यांनी दुचाकीवरून प्रवास करत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटी दिल्या चिखलवाट तुडवित त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या .त्यांनी बगपिपंळगाव ,शेकटा,नागझरी ,सावळेश्वर ,आमला वाहेगाव येथे थेट शेतकऱ्याशी शेतात जाऊन सवांद साधला तर आमला धानोरा येथील तलाव ओहरफ्लॉ झालं असून फुटण्याची श्यकता वर्तवली जात असल्याने त्यांनी त्याची फणी करण्याचे ठरवले यावेळी पाऊस चालू झालं आणि वाहन जाणे शक्य नाही असे गावकर्यांनी सांगितले पण थांबणार ते जिल्हाधिकारी कसे त्यांनी लगेच मोटार सायकल जाते का असा प्रश्न गावकऱ्याला केला हो म्हणताच चला कोणाकडे मोटारसायकल आहे आणा आणि त्यावर बसून जिल्हाधिकारी शर्मा त्या तलावापर्यंत आणि त्या भागातील शेतकऱ्यापर्यंत पोहचे  यावरून जिल्हाधिकारी यांची कार्यतत्परता व संकटात सापडलेल्या शेतक – यांविषयी तळमळ लक्षात येते . तर असा अधिकारी होणे नाही . अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याविषयी व्यक्त केल्या .नागझरी , सावळेश्वर याठिकाणी अतिवृष्टीत पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीबाबत पाहणी केली . तसेच शेती नुकसान , पिकांची दुरावस्था याची प्रत्यक्ष पाहणी करुन तालुका प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले पडत्या पावसात चिखल तुडवत जिल्हाधिकारी यांची संपुर्ण टीम आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी तसेच शासन निकषानुसार तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी शेतकन्यांच्या बांधापर्यंत पोहोचले . प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर तलाठी व इतर कर्मचारी यांचे मार्फत चालू असलेल्या प्रत्यक्ष पंचनामा व पाहणीचा आढावा घेण्यात आला . तसेच पंचनामे तात्काळ संपवा अशा सूचना देण्यात आल्या . यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे , तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब सोनवणे सह प्रशासकीय अधिकारी , तलाठी मंडळ अधिकारी व कर्मचारी हजर होते .जिल्हाधिकारी शर्मा हे पहिलेच जिल्हाधिकारी आहेत कि ज्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची फणी करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला