बीड । प्रतिनिधी
  बीड जिल्ह्य़ात ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून ज्या शेतक-यांनी पीक विमा भरला आहे, अशा शेतक-यांना ७२ तासाच्या आत तक्रार करण्याचे निर्देश प्रशासनाचे आहेत, शासनाच्या ई-पीक नोंदणी उपक्रमाचा पुरता फज्जा उडाला असून ई-पीक नोंदणीच्या आधारे नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून आज दिनांक ११ सप्टेंबर शनिवार रोजी बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश याठीकाणी तलाठी पोतदार, कृषिसहाय्यक वाघ,कोतवाल बाळकृष्ण थोरात यांनी प्रत्यक्ष सथळपंचनामे केलेले आहेत. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर उपस्थित होते. ई-पीक नोंदणीच्या आधारे नुकसानीचे   पंचनामे होणार असतील तर किती शेतक-यांकडे ई-पीक नोंदणीसाठीचे स्मार्ट फोन आहेत आणि ग्रामिण भागात नेटची मोठ्याप्रमाणात समस्या असल्याने नुकसानीचे पंचनामेच झालेले नाहीत, आठवडा उलटुनही पंचनामे होणार नसतिल तर पंचनाम्यासाठी काय शिल्लक राहणार आहे, त्यामुळेच ऑनलाइन बरोबरच ऑफलाइन पंचनामे स्विकारावेत आणि सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.