बीड । प्रतिनिधी

 चारित्र्याव संशय घेत गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील मासूम कॉलनी येथे शनिवारी ( दि .11 ) रात्री 8 च्या सुमारास घडली . घटनास्थळी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे . शेख मलिका शेख याकूब ( वय 38 ) असे मयत महिलेचे नाव आहे . त्यांना तीन मुले आहे . परंतु पती शेख याकूब शेख खुतबद्दीन ( वय 42 रा.मासुम कॉलनी , बीड ) हा सतत मलिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता . यातून त्यांचा शनिवारी ( दि .11 ) रात्री वाद झाला . यावेळी याकूबने मलिकाचा गळा दाबून तिचा खून केला . घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील , पोह.गणेश जगताप आदींनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे . या प्रकरणी आरोपी पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती .