नेकनूर (वार्ताहर)
लिंबागणेश ता. बीड येथील मुलगा महाजनवाडी येथील आपल्या आत्याकडे गेला असता घराजवळच असलेल्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला असता कमरेला बांधलेला डब्बा सुटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुलाचे नाव सागर रोहिदास वाणी वय (11) वर्ष असून ही घटना दिनांक 30 रोजी सकाळी आठ ते साडे आठ च्या दरम्यान महाजन वाडी येथील सुरवसे वस्ती या ठिकाणी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पाण्यामध्ये बुडालेल्या मुलाला पोहायला येत नसल्याने त्याने कमरेला डब्बा बांधला होता. परंतु पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर कमरेचा डब्बा अचानक सुटल्याने तो तसाच पाण्यामध्ये बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या मुलाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो दुसरा मुलगा हि कमी वयाचा असल्याने त्याला वाचवता आले नाही. व शेजारी असणारे लोकही आले तोपर्यंत हा पाण्यामध्ये बुडालेला होता. पाण्यामध्ये बुडालेला मुलगा हा लिंबागणेश येथील आहे. ही माहिती नेकनूर पोलिसांना मिळताच नेकनूर पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. विलास जाधव व पोलीस कॉन्स्टेबल सचिन डिडुळ यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांच्या मदतीने या मुलाचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.