बीड / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद मुबईच्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने ३, व ४ डिसेंबर रोजी आनंदऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर शाहू बैंकेच्या शेजारी जालना रोड बीड या ठिकाणी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचाच बीड शहर आणि जिल्ह्यातील पत्रकार व त्याच्या कुटूंबानी लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे सचिव विलास डोळसे विशाल साळुंके व पदाधिकाऱ्यांनी केले आहे .
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हा पत्रकार संघाना आवाहन करून परिषदेच्या वर्धापन दीना निमित्त आरोग्य शिबीर घेण्याचे आवाहन केले होते त्याच्या आव्हानास प्रतिसाद देत बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाने राज्यात नावाजलेले नेत्ररुग्णालय म्हणून आनंदऋषीजी चे नाव आहे त्याच्या बीड येथील रुग्णालयात पत्रकार आणि त्याच्या कुटूंबासाठी मोफत नेत्रतपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले आहे शुक्रवार आणि शनिवार या दिन दिवसात हे शिबीर घेते जाणार आहे सकाळी ११ ते साय ५ या वेळेत आपल्या सवडीनुसार तपासणी करण्यात येणार आहे शिवाय तपासणी नंतर कोणास चष्मा लागल्यास अल्प दरात तो देखील खरेदी करता येईल शिवाय काही गंभीर असल्यास त्याचा खर्च देखील अल्प असणार आहे या शिबिरासाठी रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी आनंद छाजेड यांचे मोलाचे सहकार लाभले त्यांनी शिबिराच्या प्रस्तावास टाकलं होकार देताना दोन दिवस शिबीर ठेवण्याचे सांगितले तसेच समाजसेवक गौतम खटोड याचेही मोलाची मदत होणार असल्याने या शिबिराचा सर्वच पत्रकार आणि त्याच्या कुटूंबियांनी लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे ,राज्याचे प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन , विभागीय सचिव विशाल साळूंके ,जिल्हा कार्यध्यक्ष दत्त आंबेकर, सचिव विलास डोळसे अनिल वाघमारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रचंड साळुंके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक साहस अदोडे,चंद्रकांत साळूंके आदीने केले आहे
Recent Comments