करोना व्हायरसच्या वाढत्या विळख्यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे पार्श्वभूमीवर वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे. करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं (AYUSH ministry and Coronavirus) आपल्या संकेतस्थळावर आरोग्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आहारामध्ये हळदीचा (Turmeric Health Benefits in Marathi) वापर करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयानं दिला आहे. दैनंदिन जीवनात आपण आहारामध्ये हळदीचा न चुकता उपयोग करतोच. हळदीच्या सेवनामुळे कित्येक आजारांविरोधात लढण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Boosting Tips In Marathi)वाढवण्यासाठी मदत मिळते. कारण हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा समावेश आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी आणि रात्री हळद घालून उकळलेले दूध उत्तम. हळदीच्या सेवनामुळे आरोग्याला होणाऱ्या लाभाची माहिती जाणून घेऊया..
आरोग्यवर्धक हळदीचा हजारो वर्षांपासून होतोय उपयोग
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा फुप्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांना करोनापासून बचाव करण्यासाठी खास काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हळद रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी असल्याची माहिती आयुष मंत्रालयानं आपल्या संकेतस्थळावर दिली आहे. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यावे. घातक करोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास नियमित हळदीचे सेवन करा. कारण हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यातील बायोअ‍ॅक्टिव्ह तत्त्व आरोग्यासाठी पोषक आहेत.
​हृदयविकारांपासून होतो बचावआपल्या देशात पाककृतीतील मसाले आणि आरोग्यासाठी आयुर्वेदिक औषधोपचार म्हणून हळदीचा हजारो वर्षांपासून उपयोग केला जात आहे. हळदीच्या सेवनामुळे शरीरात अँटी-ऑक्सिडेंटची क्षमता वाढते. भारतात हृदयविकारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. हळदीच्या सेवनामुळे हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. हळदीच्या सेवनामुळे शरीर आतून स्वच्छ होते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे महत्त्वपूर्ण घटक आहे. यामध्ये कार्डिओ संरक्षणात्मक गुणधर्म असतात. ज्यामुळे हृदयरोगांपासून बचाव होण्यास मदत मिळते.