बीड (प्रतिनिधी)
कोरोना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच सध्यस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामर्फत जिल्ह्यातील गावपातळीवर काम करीत असलेल्या 8५४ स्वच्छाग्रही व ग्राम रक्षक दल स्वंयसेवकांना ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित कुंभार यांनी दिली आहे.दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाच तीन टप्प्यांत एकूण नऊ सत्रात हे प्रशिक्षण पार पडलेले आहेराज्यस्तरावरून शजयंत देशपांडे शसंदीप तेंडुलकर व अरुण रसाळतरजिल्हास्तरावरून पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रदीप काकडे व जिल्हास्तरावरील वेगवेगळ्या विषयाचे तज्ञ प्रशिक्षक सहभागी झाले होते
जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत 1064 गावात कार्यरत असलेले स्वच्छाग्रही व कर्मचारी व ग्रामरक्षक दलात कार्यरत असलेल्या कर्मचा-यासाठी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थितांना विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबवि
स्वच्छग्रहीना देण्यात आलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणादरम्यान कोविड संल्पना, श्वसन संस्थेची स्वच्छता, शाररिक अंतर राखणे, अधिका जोखिम गट यांनी घ्यावयाची काळजी, मास्क वापर, प्रकार व मास्क वापरताना घ्यावयाची काळजी, गाव पातळीवर काम करताना घ्यावयाची काळजी, पाणी साठवण व स्त्रोत स्वच्छता, शौचालय वापर, विलगिकरण म्हणजे काय, कोविड 19 समज व गैरसमज व संवाद उपक्रम या विषयावर संजय मिसाळ संतोष वाघमारे रेखा कवडे रामेश्वर बनाळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश शिंदे श्री सय्यद सफदर अली यांनी सत्र निहाय प्रशिक्षण दिले