बीड , दि. ५:-जिल्हयातील आणि जिल्हयाबाहेर अडकलेल्या नागरीकांना ऑनलाईन आणि वैद्यकीय कारणांसाठी देण्यात येणाऱ्या पासेससाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नागरीकांनी केवळ योगय त्या प्रयोजनासाठीच अधिकाऱ्यांच्या नावासमोर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राहुल रेखावार, अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे

अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम, मोबाईल क्रमांक व त्यांच्या जबाबदारी पुढील प्रमाणे आहेत .

बीड जिल्हयाबाहेर जाणेसाठी अथवा बीड जिल्हयात येणेसाठीच्या ऑनलाईन ( https://beed.gov.in ) पासेस करिता
श्री . श्रीकांत निळे , तहसिलदार ( महसूल ) जिल्हाधिकारी कार्यालय बीड
९५५२४६३२७७

बीड जिल्ह्यांतर्गत जाणे -येणे साठीच्या पास करिता
( covid१९ . mhpolice . in ) प्रयोजनांसाठी
श्री . संतोष धर्माधिकारी नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड
९३७१५४७२१७

वैद्यकीय किंवा अतितात्काळ
श्री . श्रीकांत रत्नपारखी नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड
९४२२७४५५३२

अत्यावश्यक प्रयोजनासाठी
श्री . इसाकोद्यीन पाशा नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय बीड
९९२२१५२१६२

वैद्यकीय किंवा अतितात्काळ प्रयोजनांसाठी देण्यात येणाऱ्या पासेसमध्ये पुढिल बाबींसाठी पास देण्यात येणार नाही .
१ . शेतीची औषधी / रुग्णालयीन फवारणी औषधे इत्यादी आणण्यासाठी .
२ . खाजगी बँकेचे व्यवहारासाठी पासची मागणी जसे कर्मचारी कार्यालयात येणे व घरी जाणेसाठी
३ . मशीनरी दुरुस्तीसाठी व्यक्ती अथवा वस्तु साधने बाहेर जिल्हयातून आणावयासाठी व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना
४ . सख्खे नातलगांव्यतिरिक्त इतरांच्या अंत्यविधीस जाण्यासाठी .
५ . आयटी कंपनीशी संबंधित कामकाजासाठी .
६ . आस्थापना कामकाजासाठी .
७ . दर महिन्याला डॉक्टरचा सल्ला घेणेसाठी बाहेरच्या जिल्हयात जाण्यासाठी या बाबींसाठी पास देण्यात येणार नाही .असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे
००००००