बीड / सुभाष चौरे
संधीच सोने केले पाहिजे आणि ते सोने करण्याचे काम राजकारणात काही नेत्याने केले त्यांनी स्वतःच्या नांवासोबतच मिळालेल्या पदाला खुर्चीला मोठी उंची मिळवून दिली त्यात प्रामुख्याने स्व गोपीनाथराव मुंडे ,स्व आर आर पाटील आबा ,त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची नवे घ्यावीच लागणार पक्ष विचार वेगळेवेगळे आले तरी प्रत्येकानी ज्याही पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्या पदाला अधिकचे वजन महत्व प्राप्त करून देण्याचे काम या नेत्यांनी केले आहे .
राजकारणात प्रत्येकाला मोठी अपेक्षा असते पण जे पाहिजे ते मिळेलच याची शक्यता फारच कमी असते, नसते म्हटले तरी हरकत नाही पण जेही पद खुर्ची मिळाली त्या पदाला उंचीवर नेण्याचे काम काही मोजक्याच नेत्यांनी केले त्यात बीड जिल्ह्याचा नक्कीच मोठा वाट आहे कारण स्व गोपीनाथराव मुंडे,धनंजय मुंडे,पंकजा मुंडे याचे नाव घ्यावेच लागेल आणि स्व आर आर आबा देखील .स्व गोपीनाथ मुंडे याना ह्यात असताना भाजयुमो अध्यक्ष  भाजपचे प्रदेशाध्यक्ष केले त्यांनी त्यांच्यातील कुवत दाखवून भाजपाला मुख्य प्रवाहात आणले युवकाची फळी पक्षात निर्माण केली त्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांच्या मुळेच विरोधी पक्षनेता काय असतो हे अख्या महाराष्ट्राला स्व मुंडे यांनी दाखवून दिले सत्ताधारी पक्षाला त्यांनी सळोकी पळो करून सोडले होते त्यांची भाषणे ऐकण्यासाठी कोसो दूरवरून लोक स्व्यपूर्तीने येत त्यांनी त्या पदाला न्याय दिला त्यानंतर त्यांच्यावर सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी असताना मुंबईमधील गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढली हे नोंद घेण्यासारखेच आहे कारण त्यांच्या अगोदर अनेक गृहमंत्री होते पक्षाचे अध्यक्ष होते विरोधी पक्षनेते होते पण स्व मुंडे यांनी या पदाचा चेहरा मोहरच बदलून टाकला .त्या नंतर राजकारणात महाराष्ट्राला शरद पवारांनी आर आर पाटील दाखवले अगदी साधा सरळ माणूस प्रामाणिक पक्ष निष्ठा जनसेवेचे ध्यास असलेला आबा नावाचा साधा माणूस राष्टवादीचा प्रदेशाध्यक्ष पक्षाचे काम राज्याच्या कान्याकोपऱ्यात नेले सत्तेचंता काळात पहिल्यांदा कोणाला फारसे माहित नसलेले ग्राम विकास खात्याची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली ग्रामीण भागासी नाळ जुळलेल्या आबांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले गावागावात खेड्यात स्वछता व्हावी लोक निरोगी बनावेत म्हणून आर आर पाटलांनी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वछता अभियान सुरु केले आणि काही काळात हे अभियान एक चळवळ झाली आणि त्यामुळे आबा याना आधुनिक गाडगे बाबा म्हणूनही लोक संबोधित होते त्यानंतर त्यांच्याकडे गृहखाते देण्यात आले त्यांनी या खात्याला आणखी उंची देण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे गावागावातील भांडण तंटे गावातच मिटवले जावेत म्हणून तंटा मुक्त गाव अभियान सुरु केले अभियान सुरु करण्या मागे आबांची लोकभावना मोठी असायची जो निर्णय घेता तो तडीस नेला त्यामुळे त्यांनी जे पद खुर्ची मिळाली त्याची उंची वाढवण्याचे काम आबांनी आपल्या हयातीत केले.आजच्या स्थितीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे याची देखील कामगिरी दाखल पात्र आहे धनंजय मुंडे यांनी देखील मिळालेल्या संधीचे सोने केले आहे आपल्या वकृत्वाने गर्दी खेचणारे वक्ते म्हणून राष्टवादीत त्यांचे नाव आघाडीला आहे शरद पवारांनी त्यांच्यावर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि त्यांनी सक्षम पणे निभावली सभागृहात त्यांनी सत्ताधारी युती सरकारला घाम फोडला अनेकांनी गोपीनाथ मुंडे नंतरचा विरोधीपक्ष नेता म्हणून कॉलम कॉलम लिहले आणि ते खरेच होते त्यानंतर लागलेल्या निवडणुकात अनेक मैदाने गाजवली जनजागृती केली पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली आघाडीची सत्ता आल्यानंतर मंत्रमंडळात धनंजय मुंडे याना महत्वाचे खाते दिले जाणार अशी सर्वानाच अपेक्षा होती कारण धाडसी करारी नेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती पण शेवटी त्यांच्या कडे सामाजिक न्याय या खात्याचा कार्यभार देण्यात आला खाते कोणते हि असो त्याची उंची वाढणार नाही तर मुंडे कसले अन त्यांनी ते दाखून दिले या खात्यातून काय होणार काहीच नसत अशी चर्चा सर्वत्र असताना एकामागे एका सामाजिक आणि न्यायिक निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतले सुरुवातीलाच समाजाच्या बाहेर फेकल्या गेलेल्या त्रितिय पंथी समजला न्याय देण्याचे काम केले त्यांच्या उद्धारासाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आणेल गोरगरिबांच्या मुलाच्या परदेशी शैक्षणिक शिष्यवृत्ती चा प्रश्न एका मिनिटात सोडवला या सोबतच अनेक चांगले निर्णय धनंजय मुंडे यांनी घेऊन संधीचे सोने तर केलेच पण पदाची उंची देखील वाढवली .अगदी याच प्रमाणे त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे देखील कमी नाहीत त्यांचा पक्ष मोठा असल्याने अगदी मोठ्या अन पक्षातील नवजलेल्याना मोठी जबाबदारी दिली जाते असे असताना काही काळ त्यांच्या कडे भाजप महिला आघाडी भाजयुमो ची राज्याची जबाबदारी होती प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी देखील वडील प्रमाणेच महाराष्ट्र पिंजून काढत पक्ष वाढीसाठी योगदान दिले सुरुवातीला स्व मुंडे साहेबाची कन्या म्हणून गर्दी जमायची नंतर पंकजा मुंडे म्हणून गर्दी होऊ लागली हे नाकारता  येणार नाही सत्तेच्या काळात त्यांच्याकडे ग्रामविकास ,जलसंपदा ,महिला बालविकास आदी खात्याचा कारभार देण्यात आला होता त्यांनीही मिळालेल्या संधीचे विकास कमी सोनेच केले जलयुक्त शिवार योजना हि मोठी योजना त्यांनी सुरु केली त्यामुळे पाण्याचा काहीसा प्रश्न सुटला जमिनी खालील पाणी पातळी वाढली त्यानंतर अनेक ग्रामपंचायती च्या नव्या इमारती उभ्या करण्याचा निर्णय अंगणवाड्या महिला बचत घटना सन्मान राज्यात नव्हे देश पातळीवर त्याही पुढे जाऊन जागतिक पातळीवर महिलांचा सन्मान पंकजा मुंडे मुळे झाला. यासोबतच जयदत्त क्षीरसागर यांचेही नाव घ्यावेच लागेल त्यांनीही मिळालेल्या पदाला  सन्मान दिला सार्वजनिक उपक्रम हे चर्चेत नसलेले खाते त्यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी महामार्ग मोठ्या शहरातील उड्डाण पूल  (बीड मधील झाला नाही त्याला स्थानिक राजकारण आडवे आले ) आत्ताच्या काळात काही महिन्या पुरतेच मिळालेले रिहयो खाते या वेळी त्यांनी आपल्या खात्यातून ग्रामीण भागातील पांदण व शेत रस्ते घेण्याचा धाडसी निर्णय घेतला त्यामुळे मिळेल त्या पद पेक्षा त्या पदाला सन्मान देण्याचे काम आपल्या कार्यातून वरील नेत्यांनी दाखवून दिले