बीड  / प्रतिनिधी
सुरवातीच्या काळात कापसाचा चांग भाव होता कारण कापसाची उत्पन्न कमी झाले होते तसेच सोयाबीनची देखील अशीच अवस्था होती जे पदरात पडले त्याला अधिकच भाव मिळेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन साठवून ठेवला मात्र पूर्वी पेक्षा भाव उतरल्याने शेतकरी हवालदिल आहे आणि आज उद्या अधिकच भाव मिळेल या आशेवर सध्या शेतकरी आहे .
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पन्नामध्ये कापसाच्या उत्पनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या खर्चही भरून निघेल की नाही हे सांगता येत नाही. मात्र दिवाळीपूर्वी कापसाचा भाव हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल झाल्याने काही प्रमाणात उत्पादनात जरी घट झाली तरी कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी खुश होता. मात्र आणखी भाव वाढेल या आशेवर शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेला कापूस विक्री केलेला नाही. मात्र झाले उलटे दिवाळीनंतर कापसाचे भाव कमी होत होत आज ते सात हजार ते सात हजारपाचशे पर्यंत येवून ठेपले आहे कापूस उत्पादन करण्यासाठीशेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणातखर्च करावा लागतो. इतर पिकांच्या खर्चाच्या मानानेकापसाला खर्च मोठा येतो.यावर्षी सतत झालेल्याअतिवृष्टीमुळे पन्नास ते साठटक्के उत्पादन कापसाचे घटलेले आहे. उत्पादन घटल्यामुळेकापूस जिनींगवर दिवापूर्वीया कापसाला प्रति क्विंटलनऊ हजार रुपये भाव आला होता. मात्र हा भाव वाढून तो10 ते 12 हजारापर्यंत होईलअशा अनेक चर्चा शेतकर्‍यांने ऐकल्यामुळे उत्पादीत केलेला कापूस शेतकर्‍यांने मोठ्या प्रमाणात जिनींगला घातला नाही. मात्र दिवाळीनंतर उलटे होवून दिवाळीनंतर या कापसाचा भाव प्रति क्विंटलकमी झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन  कापसाच्या भाव वाढण्याची प्रतिक्षा करत आहे.