जिल्हा परिषदेचे ६० ऐवजी ६९ गट होणार असे संकेत मिळाले होते. त्यामुळे ९ गट वाढणार हे निश्चित होते.परंतु कोणत्या तालुक्यात वाढणार ही जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता लागली होती. सामान्य प्रशासन विभागाने गट आणि गण संख्या जाहीर केल्याने ही उत्सुकता संपली.

धारुर आणि शिरुर का. हे दोन तालुके वगळता इतर ९ तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण वाढली आहेत. नव्या रचनेनुसार आष्टी ८ , पाटोदा ४ , शिरूर ४ . गेवराई १० , माजलगाव ७ , वडवणी ३ , बीड ९ , केज ७ , धारूर ३ , परळी ७ आणि अंबाजोगाई ७ असे गट असणार आहेत . गेवराई तालुक्यात सर्वाधिक १० जिल्हा परिषद गट असणारं आहेत.