गोरगरीब जनतेच्या सुमन अक्का देवाघरी
(पाटोदा / प्रतिनिधी)
आष्टी तालुक्याच्या राजकारणातले दिग्गज राहिलेले स्वर्गीय रामचंद्र दादा यांच्या पत्नी आणि माजी मंत्री आ. सुरेश धस आणि माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस यांच्या मातोश्री सुमन उर्फ अक्का रामचंद्र धस यांची वयाच्या ७९ वर्षी दीर्घकालीन आजाराने देवाज्ञा झाली आहे.त्यांनी अहमदनगर येथील इंपल्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान शुक्रवार दि.११ मार्च रोजी दुपारी २ वाजता शेवटचा श्वास घेतला. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि.११ मार्च रोजी सायंकाळी ९ वाजता मूळगावी जामगाव होणार आहे..
स्वर्गीय सुमनबाई यांचे जीवन हे राजकीय कुटुंबीयांना आदर्श ठरणारे होते.सर्व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील जनतेच्या अक्का असलेल्या सुमनबाई अक्काशी सर्वांचे घनिष्ठ संबंध होते. स्वर्गीय रामचंद्र दादा धस यांची सुरुवातीची राजकीय कारकीर्द अत्यंत संघर्षमय आणि कष्टप्रद असताना आक्का यांनी त्यांना खंबीरपणे साथ दिल्याने धस दादा राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी ठरले त्यांना अत्यंत संयमी साथ आक्कांनी दिल्याने आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळं सुरेश आण्णा धस हे सरपंच पदापासून राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचले तर देविदास धस हे देखील पंचायत समिती सदस्य, उपसभापती ते जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत पोहोचले या राजकीय वाटचालीमध्ये घरी आलेल्या कोणताही पाहुणा विना चहापाणी आणि भोजनाविना गेला आहे असं कधी घडले नाही. हीच परंपरा आजही आ.धस यांच्या जामगाव आणि आष्टीच्या निवासस्थानी अविरतपणे सुरू आहे. यामध्ये अक्कांनी केलेले संस्कार आजही सुरू असल्याचे जाणवते.सतत हसतमुख आणि कोणत्याही गोष्टीला सहजपणे सामोरे जाण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्याजोगी होती. अत्यंत स्पष्ट वक्ता आणि कोणाचीही भीडभाड न ठेवता त्या बोलायच्या अर्थात त्यामध्ये मायेची ऊब ही जास्त असायची,त्यामुळे प्रत्येकजण त्यांना समजून घ्यायचे आ.सुरेश धस आण्णा मंत्री झाले दारात सर्व वैभव दिमतीला असताना साधेपणा त्यांनी कधी सोडला नाही. त्या सदैव आदर्श माता ठरल्या, अक्का या अत्यंत बोलके असल्याने सर्व विषयी अत्यंत जिव्हाळा आणि आपुलकी पदोपदी जाणवायची त्यांच्या समोर घडलेल्या सर्व घडामोडी त्यांना तोंडपाठ असायच्या त्यांना माहिती करून घ्यायची सवय होती आणि आपले अनुभव इतरांना देताना त्यांनी कधीही कमीपणा समजला नाही. मध्यंतरी एका लग्नात शोभेच्या दारूचा तो गोळा त्यांच्या पायावर पडला त्यावेळी बोटाचा अंगठा कापावा लागला तरीही त्या घाबरल्या नाहीत जीवावरच बोटावर भागलं या वृत्तीने त्यांनी या प्रसंगाला तोंड दिले सतत हसत मुखाने सहजपणे जीवन जगल्या शेवटपर्यंत आहे तशाच राहिल्या अल्पसंतुष्ट आहे त्यात समाधानी हिसाब ही वृत्ती त्यांनी शेवटपर्यंत जपली.चिखली येथील स्वातंत्र्य सेनानी बापूराव मालजी शिंदे यांच्या एकुलत्या एक कन्या विठठल,नवनाथ,नागनाथ आणि दत्ता शिंदे असे चार भाऊ असलेल्या शिंदे कुंटुबात त्यांचा जन्म झाला होता.
त्यांच्या पश्चात देवीदास धस,आ.सुरेश धस हे दोन मुले, तीन मुली,सुना,राधेश्याम,जयदत्त,सागर हे नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी जामगाव येथे आणण्यात येणार असून सायंकाळी ९ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
धस कुटूंबियांच्या दुःखात दैनिक.चंपावतीपञ परिवार सहभागी आहे.