धामनगाव येथील ११ भाविक अमरनाथ येथे अडकले ! एन.डी.आर.एफ.जवान &भारतीय लष्कराचे काम प्रगती पथावर आ.धसानी साधला भावीकाची संवाद

पाटोदा / पोपट कोल्हे….

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील ३९ भाविक भक्त अमरनाथ येथे दि.५ जुलै रोजी गेले होते तिथे दि. ८ रोजी अचानक ढगफुटी झाली, पूरग्रस्त स्थिती तयार झाली व त्यातील २८ भविक भक्त बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत तर ११ जण वरतीच अडकले आहेत, त्यांना एन डी आर एफ जवान &भारतीय लष्कराच्या मदतीने सुरक्षित स्थळे आणण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे,.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून दि.५ जुलै रोजी ३९ भाविक भक्त अमरनाथ यात्रेला गेले होते तिथे दि. ८ रोजी अचानक ढगफुटी झाली, पूरग्रस्त स्थिती तयार झाली, पूर्ण भारतामधून अमरनाथ (बाब बर्फानी) यात्रेसाठी दरवर्षी भाविक भक्त जात असतात,यावर्षी ही आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून ३९ भाविक भक्त गेले होते,त्यातील २८ भविक भक्त बालटल येथे सुखरूप खाली आले आहेत तर हे संतोष मरकड.सूरज वाढेकर.भाऊसाहेब पोकळे. भरत चौधरी.बापू शिंदे .छाया शिंदे.प्रयागा पोकळे.मनिराम खोजा.अशोक मंडा.किरण थोरवे.उषा पोकळे हे ११ जण वरतीच अडकले आहेत, तरी त्यांना एन डी आर एफ जवान &भारतीय लष्कराच्या मदतीने सुरक्षित स्थळे आणण्याचे काम प्रगती पथावर चालू आहे, अमरनाथ येथे अडकलेल्या भाविक भक्त काका पोकळे,कैलास खीलरे यांच्याशी डॉ. राजेश झिंजुर्क आणि सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी संपर्क साधला.अमरनाथ येथे गेलेल्या भाविक भक्तांची नावे -कैलास खिलारे (सांगवी पाटण) धामणगाव येथून,काका पोकळे, संदीप चौधरी (सर), संतोष मरकड,दिनेश पोकळे सर, भरत चौधरी,महेश लोखंडे, आणि इतर याच्यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे,असे मिळून ३९ भाविक भक्त गेले होते , त्यातील २८ जण खाली बालटल येथे सुखरूप आहेत तर अजूनही ११ जण वरती अडकले आहेत, अशी माहिती डॉ.राजेंश झिंजुर्के & सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी संपर्क साधला असता तेथील अडकलेल्या भाविक भक्त काका पोकळे, आणि कैलास खिलारे यांनी माहिती दिली आहे.. घटनेची माहिती भेटली असता तात्काळ लोकनेते आ.सुरेश धस, मा. पालकमंत्री धनंजय मुंडे मा. जि. प. सदस्य सतीश शिंदे, यांनी अडकलेल्या भावी भक्तांची संपर्क साधला आणि त्यांना धीर दिला, परत घरी येण्याची राज्य सरकारने सोय करावी अशी मागणी अडकलेल्या भाविक भक्तांनी आ.सुरेश धस यांच्या कडे मागणी केली..