अंबाजोगाई(प्रतिनिधी):- मतदार संघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं फेसबुक पोस्टमधून धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी फेसबुक द्वारे दिली आहे.त्यांच्या छातीला मार लागल्याने त्यांना धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार “धनंजय मुंडे यांचा अपघात झाल्याने त्यामध्ये त्यांना छातीला दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी दुपारी लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना झाले. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यानच्या धनंजय मुंडे यांना लातूर विमानतळ येथे पोचविण्यासाठी त्यांच्या सोबत पंधरा ते वीस गाड्यांचा ताफा सोबत होता.